भुसावळात दोन जिवंत काडतुस व कट्ट्यांसह दोघांना पकडले


जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : रेल्वे परीसरात आवळल्या मुसक्या

भुसावळ : शहरातील रेल्वे स्थानक परीसरात शस्त्र तस्कर गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने सापळा रचून दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपींच्या ताब्यातून दोन गावठी व कट्टे व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. प्रमोद अशोक सुरवाडे (28, रा.लालबाग बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) व मयूर कैलास सपकाळे (23, रा.वराडसीम, ता.भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

यांनी आवळल्या मुसक्या
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक बी.जी.रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक महाजन, अनिल इंगळे, सुरेश महाजन, सुनील दामोदरे, संतोष मायकल, रमेश चौधरी आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींविरुद्ध भुसावळ शहर पोलिसात गुरनं.218/2019आर्म अक्ट 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !