कन्हान नदीत पाच तरुण बुडाले
नागपूर : नागपूर नजीकच्या अम्मा का दर्गा परीसरातील कन्हान नदीत पोहोण्यासाठी उतरलेले 5 तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी 9.45 वाजताच्या सुमारास घडली. सैय्यद अरबाज उर्फ लकी (22), अयाज बेग हफीज बेग (20), मो. अबुजर मो.अल्ताफ बेग (18), मो.सप्तहिन मो.इकबाल शेख (21), ख्वाजा बेग तब्बुसर (17, सर्व रा.दिग्रस, जि.यवतमाळ) अशी या तरुणांची नावे आहेत. ते कन्हान येथील अम्मा का दर्ग्यात दर्शनासाठी आले होते. यानंतर पाचही तरुण नजीकच्या कन्हान नदी पात्रात पोहायला उतरले व बुडाले. पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे ते पुढे वाहून गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे.



