भुसावळात आजी-माजी आमदार आले आमने सामने


भुसावळ- भुसावळ तहसील कार्यालयात आधीपासुनच विद्यमान आमदार संजय सावकारे हे आपल्या मोजक्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी उपस्थित असतानाच गुरुवारी सकाळी राष्ट्रवादीचे उमेदवार सतीष घुले हे सुद्धा माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासह तहसील कार्यालयात हजर झाले मात्र पोलिसांनी उभयंतांना काही वेळ प्रवेशद्वाराजवळ थांबवले. याचवेळी
आमदार संजय सावकारे अर्ज सादर करून समर्थकांसह बाहेर येताच आजी-माजी आमदार आमने-सामने आले. पोलिसांनी आमदार सावकारेंना गर्दीतून त्यांच्या वाहनापर्यंत वाट मोकळी करून दिली. या प्रकाराने या भागात उपस्थित असलेले कार्यकर्ते व नागरीकांचे लक्ष वेधले गेले. पोलिसांनी या भागात कडेकोड बंदोबस्त लावला असून शहर व मतदार संघातील बारीक हालचालीवर लक्ष केंद्रीत केले आहे.

दोन्ही उमेदवारांचे एबी फॉर्म नाही
गुरूवारी सहा.निरीक्षक निवडणूक व तहसीलदार दीपक धीवरे यांच्याकडे भाजपाचे विद्यमान आमदार संजय सावकारे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून इच्छूक असलेल्या सतीश घुल यांनी उमेदवारी अर्ज सादर केले मात्र दोन्ही उमेदवारांनी आपापल्या पक्षाचे एबी फॉर्म जोडले नसल्याचे सांगण्यात आले. भाजपाने आमदार सावकारे यांनी तिकीट जाहीर केले असून शुक्रवारी ते शक्तीप्रदर्शन करून फार्म भरतील तर काँग्रेस-राष्ट्रवादीने अद्याप तिकीट जाहीर केले नसल्याने उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, दोन्ही उमेदवारा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवारांच्या प्रचाराला अंतर्गत सुरूवात केली आहे. यामध्ये सर्वाधिक सोशल मिडीयाचा वापर केला जात आहे.तसेच उमेदवारी अर्ज सादर करण्यापुर्वी दोन्ही उमेदवारी मतदार संघातील गावागावांमध्ये जावून मतदारांच्या भेटी घेतल्या आहेत.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !