भुसावळ मतदार संघात पाच उमेदवारांनी आठ अर्ज केले दाखल


भुसावळ- भुसावळ विधानसभा मतदारसंघात गुरूवारअखेर पर्यंत पाच उमेदवारांनी आठ अर्ज सादर केले.य ामध्ये विद्यमान आमदार संजय सावकारे यांनी भाजपाकडून दोन तर त्यांच्या पत्नी रजनी सावकारे यांनीही भाजपाकडून एक उमेदवारी अर्ज सादर केला. सतीश घुले यांनी राष्ट्रवादीकडून एक तर एक अपक्ष, रवींद्र सपकाळे यांनी अपक्ष व कैलास गोपाल घुले यांनी एक अपक्ष व एक इंडीयन मुस्लीम लिग असे दोन उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. शुक्रवारी उमेदवारी दाखल करण्याचा अंतीम दिवस असून मोठ्या संख्येने या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !