भुसावळचे आमदार संजय सावकारेंकडे दोन लाखांची रोकड तर 28 लाखांची एफ.डी.

भुसावळ : भुसावळचे विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्याकडे दोन लाखांची रोकड तर 28 लाख 39 हजार रुपयांची बँक एफडी आहे. शेअर्स आणि म्यॅच्युअल फंडात त्यांनी सात लाख 59 हजार रुपयांची गुंतवणूक केली असून त्यांच्याकडे 10 लाखांचे तर त्यांच्या पत्नी रजनी सावकारे यांच्याकडे 13 लाखांचे रुपयांचे दागिने आहेत. विशेष म्हणजे सावकारे यांच्यावर 35 लाखांंचे तर त्यांच्या पत्नी रजनी सावकारे यांच्यावर 26 लाखांचे कर्ज असल्याचे विवरण त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरून समोर आले आहे. आमदार सावकारे यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी संपत्तीचे विवरण जोडले.

