रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी कोट्यधीश

रावेर : रावेर विधानसभेतील माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे एक कोटी 38 लाख 55 हजार रुपयांची जंगम तर दोन कोटी 97 लाख 80 हजार रुपयांची स्थावर संपत्ती आहे. त्यांच्याकडे 48 हजार रुपये रोख असून 27 लाखांच्या ठेवी आहेत. त्यांचा शेती व्यवसाय असून उत्पन्नाचे स्रोत म्हणून शेती व माजी आमदारांचे पेन्शन आहे. त्यांच्या पत्नी अरुणा चौधरी यांच्याकडे एक कोटी 16 लाख 98 रुपयांची जंगम, तर 1 कोटी 35 लाखांंची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे 40 हजारांची रोकड आहे. मुलगा धनंजयच्या नावे 19 लाखांची जंगम मालमत्ता आहे. अविभक्त कुटुंबाची 12 लाखांची जंगम मालमत्ता आहे. कुटुंबाकडे 370 ग्रॅम सोने आहे. माजी आमदार चौधरींकडे 19 लाख रुपयांची, तर त्यांच्या पत्नी अरुणा चौधरी यांच्याकडे 10 लाखांची कार आहे.

