चुकून स्टेटसवर व्हिडिओ झाला सेव्ह अन् त्या डीएसपीसह महिला कॉन्स्टेबलचे अश्लील चाळे आले जगासमोर
जयपूर : राजस्थानमध्ये अश्लील व्हिडिओ प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली असताना या प्रकरणात आता नवीन खुलासा समोर आला आहे. महिला पोलीस कर्मचारी त्या डीएसपीला ब्लॅकमेल करण्यासाठी हे व्हिडिओ बनवत होती मात्र चुकून व्हिडिओ सेव्ह करताना तो स्टेटसवर आला व त्यानंतर हे प्रकरण घडल्याचा दावा निलंबीत डीएसपी हिरालाल सैनी यांनी केला आहे. स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या चौकशी दरम्यान दोघांनी सांगितले की, 10 जुलै रोजी कॉन्स्टेबलच्या आठ वर्षांच्या मुलाचा वाढदिवस होता आणि दोघांनीही मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला होता.
डीएसपीला 17 दिवसांची पोलीस कोठडी
न्यायालयाने निलंबित डीएसपीला 17 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे. पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश रेखा शर्मा यांनी एसओजीच्या मागणीवरून पोलीस कोठडी दिली आहे. एसोजी म्हणणे होते की, ज्या प्रकारचे व्हिडीओ बाहेर आले आहेत, त्यावरून बरीच गुपिते अजून उघड होणे बाकी आहे. तपास करणार्या पोलिसांनी सांगितले की, निलंबित डीएसपीचे हावभाव पाहून असे वाटते की त्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप नाही. एसओजीच्या चौकशी दरम्यान, निलंबित डीएसपी सैनी आणि महिला कॉन्स्टेबल यांच्यात सुमारे 5 वर्षांपासून संबंध असल्याचे आढळून आले आहे. या नात्यामुळे महिला कॉन्स्टेबलने आपल्या पतीला सोडले होते.




ब्लॅकमेल करण्यासाठी महिला कॉन्स्टेबल बनवत होती व्हिडीओ – सैनी
आरोपी सैनीने एसओजीला सांगितले आहे की, महिला कॉन्स्टेबलकडे असे 50 हून अधिक व्हिडिओ आणि फोटो आहेत आणि ती भविष्यात त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी हे सर्व करत होती. 10 जुलै रोजी बनवलेला हा व्हिडिओ ती तिच्या मोबाईल फोल्डरमध्ये सेव्ह करत होती, पण तो चुकून व्हॉट्सअॅप स्टेटसवर सेव्ह झाला. जो महिला कॉन्स्टेबलच्या सासरच्या मंडळींनी पाहिला आणि तिथून तो व्हायरल झाला. दरम्यान, स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे अधिकारी दोघांनाही रीसॉर्टमध्ये घेऊन गेले आणि त्यांची तपासणी केली. रीसॉर्टच्या रजिस्टरमध्ये दोघांचीही एन्ट्री झाली आहे आणि 16 हजारांचे पेमेंट देखील दाखवण्यात आले आहे.