तुला माझी शप्पथ !… कट्टर नक्षलवाद्याचे समर्पण


नवी दिल्ली : प्रेमात पडलेल्या कट्टर नक्षलवाद्याला प्रेयसीने आत्मसमर्पण करण्याची शप्पथ टाकताच भाकपा नक्षलवादी संघटनेचा कट्टर नक्षली महाराज प्रमाणिक याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. वाईट मार्गावर असलेल्या प्रियकराला प्रेयसीनं चांगल्या मार्गावर आणल्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे. आहे. झारखंडच्या सरायकेला जिल्ह्यातील ही घटना घडली. प्रियकरासोबत सुखी आयुष्याची स्वप्न पाहणार्‍या प्रेयसीने महाराजनं चांगलं जीवन जगावं यासाठी प्रयत्न केले. तिने त्याला खूप समजावलं. मात्र तरी तो संघटना सोडण्याच्या तयारीत नव्हता.

प्रेयसीचा हट्ट अखेर केला पूर्ण
नक्षलवादी संघटनेकडून काढल्यानंतर महाराज प्रामाणिक स्वत:ची संघटना तयार करण्याच्या प्रयत्नात होता. त्यानंतर त्याने परिसरात खंडणी वसूल करण्याचं काम केले. त्याच्या प्रेयसीनेही हट्ट सोडला नाही. जोपर्यंत महाराज प्रमाणिक पोलिसांना आत्मसमर्पण करणार नाही तोवर त्याला न भेटण्याचा निश्चिय प्रेयसीनं केला. प्रियकराला भेटणं प्रेयसीनं सोडलं. त्यानंतर एकेदिवशी प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी पोहचला. तेव्हा प्रेयसीने त्याला सरेंडर होण्याची मागणी केली. त्यानंतर महाराजने सरेंडर झाल्यानंतरच तुला भेटेन असं वचन प्रेयसीला दिलं.त्यानंतर त्याने पोलिसांशी संपर्क साधला आणि आत्मसमर्पण केले. पोलिसांशी संवाद साधल्यानंतर त्याने या सगळ्या गोष्टीचा खुलासा केला. मागील काही वर्षापासून महाराज एका मुलीवर जीवापाड प्रेम करतात. तिनेच नक्षली मार्ग सोडून महाराज प्रमाणिकला सरेंडर करण्यासाठी प्रोत्साहित केले असं पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आतापर्यंत पोलिसांनी दोन नक्षलींच्या आत्मसमर्पणाची अधिकृत घोषणा केली नाही.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !