रावेरात अपक्ष उमेदवार अनिल चौधरींनी शक्तीप्रदर्शनानंतर दाखल केला उमेदवारी अर्ज


रॅलीत सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, महिलांसह हजारो तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

रावेर : रावेर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार अनिल छबीलदास चौधरी यांनी शुक्रवारी जबरदस्त शक्तीप्रदर्शन करीत हजारो कार्यकर्ते व समर्थकांच्या उपस्थितीत नामनिर्देशनपत्र दाखल केले. तत्पूर्वी अनिल चौधरी यांची प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीत रावेर, यावल, फैजपूर शहरासह मतदार संघातील ग्रामीण भागातून सर्व सामान्यांसह मोठ्या प्रमाणावर युवक व महिलांचाही समावेश दिसून आला. मतदारसंघातील माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच व सदस्यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

मतदारसंघ विकासासाठी संधी द्या
शहरातील छोरीया मार्केट येथे सकाळी परीसरातील मान्यवर व मोठा जनसमुदाय विजय संकल्प मेळाव्याला उपस्थित होता. यावेळी भव्य व्यासपीठ व मोठा शामियाना उभारण्यात आला. उपस्थित मतदार व परीसरातील नागरीकांना माजी आमदार संतोष चौधरी व अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी मतदार संघाच्या विकासासाठी निवडून देण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केले. या सभे नंतर अनिल चौधरी यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भव्य मिरवणूकीस सुरूवात करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या पुतळयास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आल्यावर मिरवणूक मार्गस्थ झाली.









मतदारसंघातून स्वयंस्फूर्तीने सहभाग
रावेर, यावल, फैजपूर, शहरातील नगरसेवक, यावल, रावेर तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते तसेच अनिलभाऊ मित्र परीवार पक्षांचे पदाधिकारी यांचा मिरवणुकीत समावेश होता. यावल, रावेर तालुक्यातील आदिवासी भागातील आदिवासी बांधवही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पारंपरीक आदिवासी वाद्य व नृत्य करतांना आदिवासी बांधव दिसत होते. यावेळी मतदारसंघातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्यात जल्लोष संचारल्याचे दिसत होते.

घोषणाबाजीने शहर दणाणले
शुक्रवारी सकाळी 11 वाजेपासूनच कार्यकर्ते जथ्या-जथ्याने तहसील कार्यालयाकडे आगेकूच करत होते. अनिल चौधरी यांची मिरवणूक आली त्यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा मिरवणूकीत समावेश दिसून आला. ढोल-ताशे वाजत गाजत मिरवणूक तहसील कार्यालयाजवळ आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

दोन तास वाहतूक ठप्प
मतदारसंघातील प्रत्येक गावातून मोठ्या प्रमाणात नागरीकांची गर्दी वाढल्याने मिरवणूक संपल्यावर दोन तास वाहतूक ठप्प झाली. पोलिसांचाही तगडा बंदोबस्त दिसून आला.

यांची होती उपस्थिती
प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना नामनिर्देशनपत्र देण्यात आले. यावेळी अनिल चौधरी यांच्या सोबत फैजपूर येथील शेख कुर्बान, रावेर येथील पंकज वाघ, गणेश बोरसे, विकास पाटील उपस्थित होते. मिरवणुकीत माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, नगरसेवक शेख सादीक, डॉ.सत्तार, अ‍ॅड.सुरज चौधरी, सुधीर पाटील, दिलीप शिंदे, अब्दुल मुतल्लीब, सीताराम पाटील, पंकज वाघ, फैजपूर येथील शेख कुरबान, नासीर शेख, अन्वर खाटीक, लखन मंदवाडे, शेख हमीद शेख इकबाल, यावल नगरसेवक अभिमन्यु चौधरी, राजु वाणी, तुकाराम बारी अमोल देशमुख मनोज करणकाळ, करिम मन्यार, राजु शेख, शेरखान, अन्सार शेठ, भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, अख्तर पिंजारी, दुर्गेश ठाकूर, सतिश घुले, कृ.उ.बा. सभापती सचिन चौधरी, धीरज चौधरी, ललिता अनिल चौधरी, हर्षाताई चेतन चौधरी, नितीन धांडे, रमेश येवले यांच्यासह रावेर यावल तालुक्यातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !