भुसावळात पुन्हा जिवंत काडतुसांसह कट्टा जप्त

एकाच दिवसात चार कट्ट्यांसह चार आरोपी जाळ्यात
भुसावळ : जळगाव एलसीबीने दोन कट्ट्यांसह दोन आरोपी तर शहर पोलिसांनी एका कट्ट्यांसह एक जिवंत काडतुस जप्त केल्याची घटना ताजी असताना बाजारपेठ पोलिसांनी 4 रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास टी.व्ही.टॉवरसमोरून एकाच्या मुसक्या आवळल्या. उमेश कडू बाणाईत (24, रा.गणेशपुरी, केळकर हॉस्पिटल जवळ, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून पाच हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल तसेच एक हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
भुसावळचे उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठचे उपनिरीक्षक सारीका कोळपकर, हवालदार शंकर पाटील, दीपक जाधव, यासीन पिंजारी, कृष्णा देशमुख, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी आदींनी ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार शंकर पाटील करीत आहेत.