नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या


नवी दिल्ली : तामिळनाडूमधील वेल्लोर जिल्ह्यात राष्ट्रीय पात्रतेसह प्रवेश परीक्षा नीट दिलेल्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. 17 वर्षीय मुलीने वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी नीट 2021ची परीक्षा दिली होती, पण ती निवडली जाईल की नाही याची तिला चिंता होती. 12 वीत तिने 84.9 टक्के गुण मिळवले होते. मुलीचे वडील मजुरीचे काम करतात. यापुर्वी, नीट दिलेल्या मुलीने तामिळनाडूतील अरियालूर जिल्ह्यातील एका गावात आत्महत्या केली होती. दुसरीकडे, 19 वर्षीय धनुषने 12 सप्टेंबर रोजी परीक्षा देण्याच्या काही तास आधी आत्महत्या केली होती. अरियालूर जिल्ह्यात आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर ए.आय.ए.डी.एम.के. ने राज्यातील सत्ताधारी डी.एम.के.सरकारवर जोरदार हल्ला चढवला, तर मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी परीक्षा रद्द करण्यासाठी कायदेशील लढणार असल्याचे सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !