भारतात सन 2020 मध्ये 50 हजारांपेक्षा जास्त सायबर गुन्ह्यांची नोंद


नवी दिल्ली : 2020 साली देशात 50035 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली. आदल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण 11.8 टक्क्यांनी अधिक आहे. याशिवाय, ‘समाजमाध्यमांवरील खोट्या बातम्यांच्या’ 578 घटनांचीही या वर्षात नोंद झाली, असे नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्यूरोच्या (एन.सी.आर.बी.) आकडेवारीत म्हटले आहे. 2019 साली 3.3 टक्के इतका असलेला सायबर गुन्ह्यांचा दर (प्रति एक लाख लोकसंख्येमागे घडलेल्या घटना) 2020 साली 3.7 टक्क्यांपर्यंत वाढला, असेही यात नमूद केले आहे. 2019 साली देशात सायबर गुन्ह्यांची 44,735 प्रकरणे नोंदली गेली. 2018 साली हा आकडा 27,248 इतका होता. या गुन्ह्यांमध्ये ऑनलाइन बँकिंग घोटाळ्याची 4047 प्रकरणे, ओ.टी.पी. घोटाळ्याची 1093 प्रकरणे व क्रेडिट/ डेबिट कार्ड घोटाळ्याची 1194 प्रकरणे होती, तर ए.टी.एम.शी संबंधित 2160 प्रकरणे 2020 साल नोंदण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !