मोठी दुर्घटना ! नदी पात्रात होडी उलटून 22 नागरीक बेपत्ता


नवी दिल्ली : नदीपात्रात अचानक होडी उलटल्याने होडीतील तब्बल 22 नागरीक पाण्यात बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. बिहारच्या मोतिहारीत रविवारी सकाळी ही मोठी दुर्घटना घडली. सिकरहना नदीमध्ये होडी उलटल्याने 22 जण बुडाले आहेत. स्थानिकांनी एक मृतदेह बाहेर काढला असून अन्य लोकांचा शोध सुरू करण्यात आला आहे. ही दुर्घटना शिकारगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोढिया गावात घडली आहे. स्थानिक पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून प्रशासन बचावकार्याला लागले आहे. स्थानिकांनी सांगितले की, होडीमध्ये 20 ते 25 जण होते. गोढिया गावात होडी बुडाली. यामुळे तिथे खळबळ उडाली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !