चाळीसगावात शिवरायांच्या पुतळा आगमन रॅलीत नियमांचे कोरोना उल्लंघण : खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाणांसह पाच हजार नागरीकांविरोधात गुन्हा


चाळीसगाव : चाळीसगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे रविवारी मोठ्या जल्लोषात आगमन झाले असलेतरी स्वागत रॅलीत जल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशाचे उल्लंघण करून सोशल डिस्टन्स न पाळणे, मास्क न लावण्याप्रकरणी खासदार उन्मेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह तब्बल ापाच हजार नागरीकांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

लोकप्रतिनिधींसह नागरीकांविरोधात गुन्हे दाखल झाल्याने खळबळ
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत चाळीसगाव पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बिलाखेड ते शहरातील सिग्नल चौकापर्यंत रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या आगमन व स्वागतानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान सोशल डिस्टन्सचे पालन न करणे, मास्क न लावणे व जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशाचे उल्लंघण केल्याप्रकरणी पोलीस नाईक भटू पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खासदार उमेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, नगरसेवक राजेंद्र चौधरी, घृष्णेश्वर पाटील, पंचायत समिती सदस्य संजय पाटील, शेखर देशमुख, भगवान पाटील, जगदीश चौधरी, श्याम देशमुख, नगरसेवक संजय पाटील, रामचंद्र जाधव, सूर्यकांत ठाकूर, नितीन पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, सदानंद चौधरी यांच्यासह चार ते पाच हजार जनसमुदायाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहेत.





जयंती कार्यक्रमातही नियमांचे उल्लंघण : दोन हजार नागरीकांविरोधात गुन्हा
दुसर्‍या घटनेत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक पंढरीनाथ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आद्य क्रांतिकारक तंट्या तात्या (नाईक) यांच्या जयंतीनिमित्त रविवारी दुपारी तीन ते पाच वाजेच्या दरम्यान राष्ट्रीय महाविद्यालय मैदानात जमुन सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याप्रकरणी तसेच तोंडाला मास्क न लावल्याप्रकरणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशाचे उल्लंघध केल्याप्रकरणी देवराम गायकवाड, सुधाकर वाघ, मोतीलाल पवार, पवनराजे सोनवणे, रवींद्र सोनवणे, पिंटू सोनवणे, सुरेश सोनवणे, प्रवीण मालचे, दशरथ मोरे, गणेश वाघ यांच्यासह जवळपास दोन हजारांच्या जनसमुदायाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !