भरधाव बस नदीपात्रात कोसळल्याने चार प्रवाशांचा मृत्यू
नवी दिल्ली : प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू तर 16 प्रवासी जखमी झाले. मेघालयमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. तुरा येथून शिलाँगला जाणारी बस बुधवारी रात्री 12 वाजता रिंगडी नदीत कोसळली. नदीतील पाण्यामुळे बचावकार्यामध्ये अडथळा येत आहे. अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी तातडीने बचाव पथक आणि आपत्कालीन सेवा दल दुर्घटनास्थळी दाखल झालं. या बचाव कार्यादरम्यान आतापर्यंत चार मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मेघालयातील या अपघातग्रस्त बसमधून जवळपास 21 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 16 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं असून ते यामध्ये जखमी झाले आहेत. सध्या त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मात्र जखमींपैकी काहींची प्रकृती ही अत्यंत चिंताजनक आहे, अशी माहिती पोलिसांनी दिला आहे. हा अपघात नोंगचरम पुलावर झाला. बस वेगात होती. याचवेळी चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने ती रेलिंग तोडून थेट नदीमध्ये कोसळली.
Meghalaya | Four passengers died after a bus travelling from Tura to Shillong fell into Ringdi river at Nongchram at 12 am. Injured have been hospitalised. Rescue operation for other passengers is underway: East Garo Hills Police pic.twitter.com/JvmD1dl6w6
— ANI (@ANI) September 30, 2021



