नंदुरबार एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शिरीष जाधव सेवानिवृत्त


एसीबीत आलेल्या तक्रारदारांना नेहमीच न्यायाची भूमिका -शिरीष जाधव

नंदुरबार : नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिरीष जाधव हे 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून गुरुवार, 30 रोजी सेवानिवृत्त झाले. याप्रसंगी सहकारी कर्मचार्‍यांतर्फे त्यांना प्रेमाचा निरोप देण्यात आला.

यांची होती उपस्थिती
सेवानिवृत्तीच्या छोटेखानी झालेल्या कार्यक्रमास जाधव यांच्या परीवारातील त्यांच्या पत्नी ज्योती शिरीष जाधव, मुलगा अनिकेत जाधव, ऋषीकेश जाधव, सासुबाई प्रमिला पाटील तसेच नंदुरबार एसीबीचे निरीक्षक वाघ, पोलीस हवालदार उत्तम महाजन, दीपक चित्ते, अमोल मराठे, संदीप नावडेकर, संजय गुमाणे, मनोहर बोरसे आदींची उपस्थिती होती.






तक्रारदारांना नेहमीच न्यायाची भूमिका
याप्रसंगी मनोगतात उपअधीक्षक शिरीष जाधव म्हणाले की, एसीबीत आलेल्या तक्रारदारांना नेहमीच न्याय देण्याची भूमिका वठवली मात्र कामकरीत असताना खोट्या तक्रारींना कधीही थारा दिला नाही शिवाय लोकसेवकांवर अन्याय होवू दिला नाही. सेवेचे व्रत प्रामाणिकपणे अंगीकारत आज 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत असल्याने काहीसे दुःख असलेतरी बदली, बढती व सेवानिवृत्त हा कामाचा भाग असल्याचेही ते म्हणाले.

तब्बल 51 आरोपींवर ट्रॅप
पोलीस उपअधीक्षक जाधव यांच्या कार्यकाळात तब्बल 51 लाचखोरांवर एसीबीने ट्रॅप केले. जाधव यांनी आतापर्यंत मुंबई, अहमदनगर, रायगड, ठाणे ग्रामीण, धुळे, दोंडाईचा, मुंबई, वरळी आदी ठिकाणी सेवा बजावल्यानंतर नंदुरबार एसीबीतही प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !