माजी मंत्री महाजनांचा धक्कादायक आरोप : खडसे आपल्याविरोधात मोक्कान्वये कारवाईच्या प्रयत्नात


गिरीश महाजन उवाच : खडसे आपल्याविरोधात मोक्कान्वये कारवाई करण्याच्या प्रयत्नात : मुलीच्या पराभवाचे आत्मचिंतन करण्याची गरज

जळगाव : मास्तराच्या मुलाची बाराशे कोटींची प्रॉपर्टी? असा सवाल माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी गिरीश महाजन यांचे नाव न घेता बोदवडमधील राष्ट्रवादीच्या बैठकीत शुक्रवारी उपस्थित केला होता. खडसेंच्या टिकेला माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील उत्तर दिले आहे. ज्येष्ठ नेते खडसे आता राज्यातील सत्ताधारी पक्षात असून तेथे त्यांच्या शब्दाला मान असल्याने त्यांनी खुशाल सरकारला सांगून आपल्या मालमत्तेची चौकशी करावी, असे आवाहनच महाजन यांनी दिले आहे. ते म्हणाले की, खडसे हे वडिलोपार्जीत प्रॉपर्टी असल्याचा दावा करतात मात्र शेतात त्यांनी काय-काय पेरले हेदेखील त्यांनी आम्हाला सांगावे, असे महाजन यांनी सांगत खडसे आपल्यावर मोक्का लावण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोपही महाजन यांनी केला.

खडसेंचा तोल सुटला
माजी मंत्री महाजन म्हणाले की, हल्ली खडसे माझे थेट नाव न घेता माझ्यावर बेछूट आरोप करीत आहेत मात्र मात्र आता त्यांची कीव येत आहे. मध्यंतरी पुण्यात माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. अलीकडे खडसे मंत्री होणार असल्याची चर्चा झाली मात्र साधे आमदारही त्यांना होता आलेले नाही, विधानसभा निवडणुकीत मुलीचा सपाटून पराभव झाल्याने त्यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.





खडसेंनी शेतजमिनींच्या भावाचा नक्कीच तपास करा
माजी मंत्री महाजन म्हणाले की, माझे वडील शिक्षकच होते मात्र आमच्याकडेही शेतजमीन होती त्यामुळे आता या शेतजमिनीचे काय भाव झाले याचा खडसे यांनी निश्‍चित तपास करावा. सध्या खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरू असून त्यांनी ईडीला सामोरे जाण्याची गरज आहे.
दुध का दुध पाणी का पाणी करा, सरकारला सांगून आपल्या मालमत्तेची चौकशी करा, असे आव्हानच महाजनांनी यावेळी दिले. नाथाभाऊ तुम्ही निर्दोष असाल तर आम्ही डोक्यावर घेवून नाचू, असेही महाजन म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !