सख्खा भाऊ पक्का वैरी : भावासह वहिनीची कुर्हाडीचे वार करीत हत्या
नवी दिल्ली : जादू-टोण्याच्या संशयातून आपला भाऊ आणि वहिनीची कुर्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना छत्तीसगडच्या जशपूरमध्ये घडली. विशेष म्हणजे आरोपीच्या पत्नीनेदेखील गुन्ह्यात साथ दिली.
कुर्हाडीने वार केल्यामुळे पती-पत्नीचा जागीच मृत्यू
शुक्रवारी रात्री बुधमन आपल्या भावाच्या घरी अचानक आला आणि काहीही न बोलता कुर्हाडीने त्यांची निर्घृण हत्या केली. याच दरम्यान हा प्रकार त्याच्या वहिनीने पाहिला आणि ती आरडाओरडा करत घराबाहेर आली. त्यावेळी आरोपीने तिलाही पकडलं आणि तिची देखील हत्या केली. कुर्हाडीने वार केल्यामुळे पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, भाऊ आणि वहिनी हे जादूटोणा करायचे. त्याच्यामुळे आमच्या कुटुंबाला धोका होता म्हणून हत्या केली.



