मित्रानेच केला विवाहितेवर अत्याचार : पतीसह दोघांना बेड्या


जयपूर : पती-पत्नीच्या पवित्र नात्याला एका नराधमाने कलंक फासला. अवघ्या पाचशे रुपयांसाठी पतीने आपल्या पत्नीला नराधमाच्या हवाली केल्यानंतर नराधम मित्राने विवाहितेवर अत्याचार केला. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. राजस्थानमधील शेखावटी भागातील सीकर जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली.

पीडीतेच्या तक्रारीनुसार गुन्हा
ठाणे प्रभारी मदनलाल कडवासरा यांनी सांगितले की, पाच दिवसांपूर्वी गुजरातमधील एका 21 वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली होती. पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिने रींगस परिसरातील मऊ गावातील तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. पाच दिवसांपूर्वी रात्री सुमारे 9 च्या सुमारास पीडिता तिच्या पतीसोबत रींगस भागातील भैरुंजी येथे एका हॉटेलजवळ बसली होती. या दरम्यान तिच्या पतीचा मित्र महरोजी येथील सोनू शर्मा तिथे आला. तिथे तिच्या पतीने 500 रुपये घेऊन तिला सोनू शर्माच्या हवाली केले. त्यानंतर सोनू पीडित महिलेला महरोलीच्या दिशेने एका निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. सीकर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक राजेश कुमार आर्य यांनी या प्रकरणाचा उलगडा करत केवळ 24 तासांत आरोपी सोनू आणि पीडितेच्या पतीला बेड्या ठोकल्या.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !