माजी मंत्री एकनाथराव खडसे बॉम्बे रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल


वकीलांची न्यायालयात माहिती : अंजली दमानियांनी सोडले टिकास्त्र

मुंबई : राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला दिली आहे. भोसरी जमीन प्रकरणी खडसे बुधवारी मुंबईतील सेशन कोर्टामध्ये अनुपस्थित राहिले होते. याच अनुपस्थितीसंदर्भात न्यायालयाला माहिती देताना वकिलांनी खडसे आजारी असल्याचं सांगितलं. खडसेंवर एक महत्वाची शस्त्रक्रीया होणार आहे. त्यासाठी त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वकिलांनी न्यायालयाला सांगितले आहे.

उद्या खडसेंवर होणार शस्त्रक्रिया
सूत्रांच्या अधिकृत माहितीनुसार, माजी मंत्री खडसे यांच्यावर गुरुवार, 7 रोजी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी खडसे हे बॉम्बे रुग्णालयात मंगळवार, 5 रोजी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. खडसे यांची प्रकृती स्थिर असल्याचेही सूत्र म्हणाले.





अंजली दमानियांनी केले ट्वीट
खडसेंच्या वकिलांनी दिलेल्या माहितीवरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शंका उपस्थित करत टीका केलीय. एकनाथ खडसे हे न्यायालयासमोर खोटं बोलत असल्याचा आरोप दमानिया यांनी आपल्या ट्विटरवरुन केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !