हाय प्रोफाईल व्यापार्याच्या आत्म्हत्येनंतर पत्नीने चिरला स्वतःचा गळा
नवी दिल्ली : हायप्रोफाईल व्यापार्याने स्वतःच्या कार्यालयात गळफास लावून आत्महत्या केल्यालनंतर त्याच्या पत्नीने देखील स्वतःचा गळा कापून घेतला. पत्नीला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ती सध्या मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ही घटना घडली.
लोकप्रिय व्यापार्याच्या आत्महत्येने खळबळ
उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये राहणारे इंटेरीयर डेकोरेटर अमित बन्सल हे शहरातील अत्यंत लोकप्रिय इंटिरीअर डिझायनर आणि पीओपीचे व्यापारी होते. त्याचं स्वत:च एक मोठं ऑफिस देखील होतं. नेहमीप्रमाणे अमित त्यांच्या कार्यालयात आल्यानंतर त्यांनी तिथे गळफास लावून आत्महत्या केली. अमित यांच्यापाठोपाठ काही वेळाने त्यांची पत्नी पिंकी कार्यालयात आली. पतीने गळफास घेतल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी लगेचच पेपर कटरने स्वतःचा गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पिंकी यांना कर्मचार्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. अमित बन्सल यांनी आत्महत्या केल्याने कुटुंबीयांना खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे.




थरथरत्या हाताने दिला मुलाला मुखाग्नी
अमित यांचे वडील रामकिशन बन्सल यांनी पाणावलेले डोळे आणि थरथरत्या हाताने आपल्या मुलाला मुखाग्नी दिला आहे. अमित यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अमित यांच्या आत्महत्येमागील कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत, पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आणि त्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला. अमित तणावात असल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.