खतरनाक लव्हस्टोरी ! : सात मुलांची आई प्रियकरासोबत रफूचक्कर
नवी दिल्ली : प्रेमाला वयाचे बंधन नसते शिवाय ते आंधळ असल्याचा प्रत्यय पुन्हा आला आहे. तब्बल सात मुलांची आई असलेली विवाहिता तरुणाच्या प्रेमात आकंठ बुडाली व तरुणासोबत रफुचक्कर झाल्याने सासरवाडीतील लोकांनी आता पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशातील गाजीपूरच्या गदाईपूरमध्ये ही घटना घडली.
विवाहिता दोन मुलांना सोबत घेवून पळाली
महिलेच्या सासरच्या लोकांना माहिती मिळाली की, त्यांच्या सूनेचं बलिया जिल्ह्यातील तिराहीपूरमध्ये राहणार्या सरदार चौधरीसोबत प्रेम प्रकरण सुरू होते. सरदार चौधरीची बहिण गदाईपूरमध्ये दिली आहे. त्यामुळे तिला भेटण्यासाठी तो इथे येत-जात होता. यादरम्यान तो किरणच्या संपर्कात आला. यादरम्यान सरदार आणि किरणची जवळीकता वाढली. काही दिवसांपूर्वी ती तिच्या दोन लहान मुलांना घेऊन प्रियकरासोबत पसार झाली. विवाहितेच्या सासर्याने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यानंतर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विवाहितेचा पती धनराज चौधरी कामासाठी पंजाबच्या लुधियानात वास्तव्यास आहे तर विवाहितेला पाच मुली आणि दोन मुले आहेत. पोलीस अधिकारी त्रिवेणी लाल सेन यांनी सांगितलं की, महिलेच्या सासर्यांनी तक्रार दिली आहे. तरूणावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे.



