म्यानमारच्या बंडखोर सैन्यावर भीषण हल्ला ; 40 सैनिक ठार


यंगून : म्यानमारच्या सैन्यावर घात लावून बसलेल्या पीपल्स डिफेन्स फोर्सने मोठा हल्ला केला आहे. यामध्ये 40 हून अधिक सैनिकांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक सैनिक जखमी झाले आहेत. हा हल्ला बंडखोर सैन्याविरोधात लढणार्‍या संघटनेने केल्याचे सांगितले जात आहे. मगवे भागातील गंगाव परिसरात हा हल्ला झाला. याव डिफेन्स फोर्सने सांगितले की, त्यांच्या सदस्यांनी एका सैन्याच्या ताफ्यावर हा हल्ला केला. या ताफ्यात 50 हून अधिक वाहने होती. वायडीएफने म्यानमारचे वृत्तपत्र इरावडीला सांगितले की, त्यांनी 14 भूसुरुंगांच्या मदतीने सैन्याची वाहने उडवून दिली. सैन्याची ही वाहने गंगाव-पाले हायवेवरून जात होता. यामध्ये 40 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात एका शस्त्रास्त्रांनी भरलेल्या वाहनालादेखील उडवून देण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !