काँग्रेसच्या काळातील विकासकामांचे आमदार जावळेंनी लाटले श्रेय


माजी आमदार शिरीष चौधरींचा आरोप ; भाजपा प्रवेशाची केवळ अफवा

फैजपूर- सरकार चालवायचे असेल तर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करावी लागते मात्र रावेर यावल मतदार संघात आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक ही माणसे आहे की नाही ? असा प्रश्‍न उपस्थित करीत या जाती-जमातीला सावत्र वागणूक देण्यात आली शिवाय काँग्रेसच्या काळातील विकासकामांचे आमदार हरीभाऊ जावळे श्रेय लाटत असल्याचा आरोप माजी आमदार शिरीष चौधरी यांनी येथे केला. यावल तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या संयुक्त मेळावा गुरुवारी येथील धनाजी नाना महाविद्यालयात गुरुवारी झाला. याप्रसंगी ते बोलत होते.

भाजपा प्रवेशाची निव्वळ अफवा
गेल्या 15 दिवसांपासून माजी आमदार शिरीष चौधरी भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगत असून काही वृत्तपत्रांतून तशी बातमी छापून आली असल्याने माजी आमदार चौधरी म्हणाले की, माझ्या वडिलांपासून आम्ही काँग्रेस पक्षाच्या पायावर आम्ही उभे आहोत. माझ्या वडिलांचे नाव पुसून मी दुसर्‍या पक्षात जाण्याचा विचारही करू शकत नाही, असे त्यांनी सांगत मी मुंबईत कोणत्याही भाजपाच्या नेत्यांना भेटलो नाही किंवा भाजपाच्या नेत्यांनी मला फोन करून काही सांगितले नाही त्यामुळे भाजपात जाणार असल्याची केवळ अफवाच असल्याचे ते म्हणाले.


कॉपी करू नका.