धक्कादायक ! : घरजावयाने केली पत्नीसह सासूची गोळी झाडून हत्या


नवी दिल्ली : सासरवाडीत घरजावई म्हणून आल्यानंतर सासू-सासरे सातत्याने टोमणे मारून कुचकट बोलत असल्याने संतापलेल्या पतीने गोळी झाडून सासुसह पत्नीची हत्या केली. राजधानी दिल्लीत ही घटना घडली. आरोपीला अटक करण्यात आली.

या कारणामुळे केली हत्या
हरीदास नगर येथे आपल्या पत्नीसह सासू-सासर्‍यांकडेच आरोपी राहत होता. त्यावरुन, घरजावई झालेल्या बाबा यांस सासू-सासरे टोमणे मारत असत. दररोजच्या या टोमणे आणि कुचकट बोलण्याला वैतागूनच आरोपीने पत्नी आणि सासूचा खून केला. आरोपीने स्वत: फोन करुन घडलेली घटना पोलिसांना सांगितली. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी बाबाला अटक केली आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !