जळगावात तरुणाची गळफास घेत आत्महत्या


जळगाव : शहरातील पिंप्राळा भागात राहणार्‍या 25 वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. रविवारी सकाळी 10 वाजता ही घटना उघडकीस आली. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हितेश नाना बाविस्कर (25, रा.सिध्दार्थ नगर, पिंप्राळा हुडको) असे मयत तरुणाचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
हितेश बाविस्कर हा आई-वडीलांसह वास्तव्यास होता शिवाय मोलमजुरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करीत होता. रविवार, 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास तरुण राहत्या घरात एकटा असताना त्याने गळफास घेतला. आई घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. नातेवाईकांनी मृतदेह उतरवून तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी संदीप पाटील यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत हितेशच्या पश्चात आई लताबाई, वडील नाना बाविस्कर, पत्नी राणी आणि एक वर्षाची मुलगी आणि बहिण असा परीवार आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार विनोद सोनवणे करीत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !