राम रहिमसह पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा


चंदीगड : डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरूमीत राम रहिम याच्यासह त्याच्या अन्य चार साथीदारांना न्यायालयाने सोमवारी सेवादार रणजितसिंह याच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सेवादार रणजीतसिंह याच्या हत्येप्रकरणी 8 ऑक्टोबर रोजी न्यायालयने राम रहिम दोषी ठरले होते. त्यानंतर सोमवारी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. बाबा राम रहिम यांच्याबरोबरच त्यांच्या इतर पाच साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सीबीआयच्या स्पेशल कोर्टात गुरमीत राम रहिम यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर इतर चार आरोपींना देखील जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राम रहीम आणि त्यांच्या सहकार्यांना कोर्टात 8 ऑक्टोबरलाच दोषी ठरवण्यात आलं होतं. पण कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. कोर्टाकडून आज निकालाचे वाचन करण्यात आले. यात राम रहिमसह साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !