गावठी पिस्टलासह काडतूस जप्त; एकाला अटक


जळगाव : गावठी बनावटीच्या पिस्टलासह दोन जिवंत काडतूस घेवून फिरणार्‍या तरूणाला एमआयडीसी पोलिसांनी मेहरुण परीसरात अटक केली. शहरातील मेहरूण परीसरात एक तरूण बेकायदेशीर गावठी बनावटीचा पिस्टलसह काडतूस घेवून फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकातील पोलीसांनी शुक्रवार, 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास कारवाई करत संशयीत आरोपी योगेश अंबादास बारी (31, रा.बारीवाडा पिंप्राळा) याला अटक केली. आरोपीच्या कमरेला गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतूस आढळल्यानंतर ते जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशीरा पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश बारी याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !