अर्थे शिवारात नायब तहसीलदारांना धक्काबुक्की : वाळू माफियांनी पळविले दोन ट्रॅक्टर


शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : वाळू माफियांची मुजोरी वाढली

शिरपूर : अवैध वाळूचा उपसा करीत वाहतूक करणार्‍या दोन ट्रॅक्टरांना तालुक्यातील अर्थेलगत शहादा रस्त्यावर म्हाळसा पेट्रोल पांपजवळ गस्ती पथकाने ताब्यात घेतल्याने कारवाई सुरू असतांना वाळू माफियांनी नायब तहसीलदार व गस्ती पथकास अरेरावी व धक्काबुक्की करीत दोन्ही ट्रथक्टर पळवून नेले. ही घटना शुक्रवार, 22 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 ते 4.30 दरम्यान घडली. शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी चार जणांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तालुक्यातील नदी-नाल्यातून बेसुमार वाळूचा उपसा करून अवैध वाहतूक करणार्‍या वाहनांवर महसूल विभागाच्या पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवार, 22 ऑक्टोबर रोजी पहाटे नायब तहसीलदार ए.बी.पेंढारकर हे मंडळ अधिकारी एस.सी.गुजर, तलाठी पी.पी.गिरासे, देवेंद्र येशी, डी.एस गुशिंगे, आर.एन.पवार, व्ही.बी.नागलोत, सतीष पाटोळे यांच्या पथकासह शिरपूर शहादा रस्त्यावर गस्ती घालत असतांना पहाटे चार वाजेच्या सुमारास म्हाळसा पेट्रोल पंपाजवळ विना नंबरचे निळ्या रंगाचे आयशर व लाल रंगाचे महिंद्रा असे दोन ट्रक्टरमधून वाळूची अवैध वाहतूक होताना दिसून आली. पथकाने ट्रॅक्टर ताब्यात घेतले असता कारवाई सुरू असतांना ट्रॅक्टर मालक याने घटनास्थळी येत दमदाटी करीत नायब तहसीलदार ए.बी.पेंढारकर यांना धक्काबुक्की करीत मोठा दगड घेत मारण्याचा प्रयत्न करून 62 हजार 800 रुपये किंमतीच्या वाळूसह दोन्ही ट्रॅक्टर पळवून नेले. या प्रकरणी तलाठी डी.डी.येशी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ट्रॅक्टर मालक अमोल उर्फ भुर्‍या शालीक पाटील, मोतीलाल पूर्ण नाव माहीत नाही तसेच ट्रॅक्टर चालक रमेश नारायण पावरा व राकेश साहूजा पावरा (सर्व रा.बोराडी, ता.शिरपूर) यांच्या विरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !