अश्लील व्हिडिओ बनवणारी हनी ट्रॅप टोळी पोलिसांच्या जाळ्यात
कोट्यवधींची माया जमवली : अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
नवी दिल्ली : लोकांचे नग्न व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करणार्या गँगचा गाझियाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गँगचा म्होरक्या योगेश गौतम आणि त्याची पत्नी सपना गौतम व निकीता, निधी, प्रिया यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या तीन युवती जाळ्यात अडकलेल्या लोकांना अश्लिल व्हिडीओ करत होत्या. सायबर विभागाचे अधिकारी अभय कुमार मिश्र म्हणाले की, 5 वर्षापूर्वी योगेश आणि सपना एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांमध्ये सुरुवातीला मैत्री झाली नंतर प्रेमविवाह केला. पहिल्याच वर्षात दोघांनी शिक्षण सोडून दिलं आणि पैसे कमवायचं खुळ त्यांच्या डोक्यात आलं.
अनेकांना ठगवल्याचा संशय
पोलिसांनी हनीट्रॅप गँग चालवणार्या दाम्मत्याला पकडलं. दोघांच्या खोलीवर छापेमारी केली तेव्हा 4 मोबाईल, एक चेक, तीन पासबुक, 2 पासपोर्ट, 3 एटीएम कार्ड, 3 पॅनकार्ड, 6 वेब कॅमेरे, 3 आधार कार्ड 5, फेस मास्क, 2 जोडी पायल, एक ईअर रिंग, अंगठी, 8 हजार रुपये आणि आणखी सामान जप्त केले. पोलिसांनी या प्रकरणी योगेश आणि सपना यांच्यासह 5 जणांना अटक केली आहे. गेल्या 3 वर्षात या दाम्पत्याने 3 युवतींना हाताशी धरत तब्बल 500 जणांची फसवणूक केली आहे. या लोकांकडून कोट्यवधीची वसूली करत दोघं दाम्पत्य मौजमज्जा करत होते. बर्याच काळापासून हा ग्रुप लोकांना ठगत होता. गाझियाबाद पोलिसांनी राजकोटच्या व्यक्तीच्या तक्रारीनंतर या गँगचा पर्दाफाश केला. तुषार नावाच्या व्यक्तीनं राजकोटमध्ये तक्रार दाखल केली होती. त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून 80 लाख रूपये उकळण्यात आले.



