बस दरीत कोसळली ; 11 प्रवाशांचा मृत्यू
जम्मू : डोडाकडे जात असलेली मिनी बस गुरुवारी सकाळी दरीत कोसळली. यात 11 जण ठार झाले तर 8 जण जखमी झाले आहेत. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रत्यक्षदर्शींनुसार, रोड सोडून बस अचानक दरीत कोसळली. लोकांनी मदतीसाठी फोन केले. अर्ध्या तासात लष्कराची पथके घटनास्थळी पोहोचली. जखमींना एअरलिफ्ट करून रुग्णालयात पोहोचवण्यात आले. काहींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.