दाभाडीच्या वृद्धाचा मलकापूरात खून ?
डोक्यात दगड टाकल्याचा संशय ; पोलिसांकडून बारकाईने तपास
मलकापूर- मोताळा तालुक्यातील दाभाडी येथील 55 वर्षीय इसमाचा मृतदेह गुरुवारी सकाळी आठ वाजेदरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डाजवळ आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मोठा दगड व रक्ताच्या चिरकांड्या उडाल्यो हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद बारकाईने तपास सुरू केला आहे.
दाभाडीच्या इसमाचा खून
रेल्वे स्टेशननजीक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे यार्डनजीक गुरुवारी यादव जानकीराम डहाके (55) यांचा मृतदेह आढळला. रात्रभर पाऊस सुरू असल्याचे हा मृतदेह पाण्यात पडून होता तर यार्डात एक मोठा दगड व रक्ताच्या चिरकांड्या तसेच प्रेत ओढत आणल्याच्या खुणा आढळल्याने खून झाल्याचे बोलले जात आहे. प्रेताचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.