भुसावळ विधानसभेच्या जागेसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे ‘लॉबिंग’


उच्चशिक्षित संजय ब्राह्मणेंची दावेदारी ; जागा काँग्रेसला सोडण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह

भुसावळ- भुसावळची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला असलीतरी सेवानिवृत्त अभियंता व उच्च शिक्षीत संजय ब्राह्मणे हे काँग्रेसकडून ही जागा लढवण्यास इच्छूक आहे. पक्षाच्या वरीष्ठ पदाधिकार्‍यांच्या त्यांनी आतापर्यंत भेटीगाठी घेतल्यानंतर गुरुवारी त्यांनी मुंबईतील गांधी भवनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेत भुसावळच्या जागेसाठी उमेदवारी देण्याची मागणी केली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला भुसावळातून मिळालेली मते व भुसावळातील आत्ताच्या असलेल्या राजकीय स्थितीबाबत त्यांनी सविस्तर चर्चा करीत राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेली जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी केली. थोरात यांनी ब्राह्मणे यांच्याशी सविस्तर चर्चा करीत त्यांचा बायोडाटा व अन्य बाबींची चौकशी करून जागेबाबत सकारात्मक विचार केला जाणार असल्याचे आश्‍वासन दिले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मो.मुन्वर खान पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


कॉपी करू नका.