पाचोरा तालुक्यातील जवान नक्षलवाद्यांच्या चकमकीत शहिद


पाचोरा : पाचोरा तालुक्यातील सावखेडा बु.॥ येथील जवान नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शनिवारी मध्यरात्री पठाणकोट (पंजाब) येथे शहिद झाला. सोमवारी शासकीय इतमामात जवानाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. या घटनेने पाचोरा तालुक्यावर शोककळा पसरली.

नक्षलवाद्यांच्या चकमकीत जवान शहिद
शनिवार, 13 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पठाणकोट (पंजाब) येथे देशसेवा करत असतांना नक्षलवाद्यांच्या चकमकीत मंगलसिंग परदेशी हे शहिद झाले आहे. या घटनेमुळे सावखेडा बु, सावखेडा खु, वरखेडी, डांभुर्णी, मोंढाळे, ता. भुसावळसह परीसरात मोठी शोककळा पसरली आहे. सावखेडा गावी घटनेची माहिती मिळताच मोठा जनसमुदाय लोटला होता. वृद्ध आई वडील, दोन भावंडासह नातेवाईक व गावकर्‍यांनी एकच आक्रोश केला. शहिद जवानाचे पार्थिव सोमवारी पठाणकोट येथून विमानाने औरंगाबाद येथे आल्यानंतर तेथुन मिल्ट्रीच्या वाहनातून गावी आणल्यानंतर सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.





पठाणकोट येथे देशसेवेत
पाचोरा शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या सावखेडा बु येथील जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी (वय – 35) हा सन – 2005 मधे अलीबाग येथे भारतीय सैन्यात भर्ती झाल्यानंतर त्याने सिकंदराबाद येथे प्रशिक्षण घेतले होते. 2014 मधे त्याचा मोंढाळे ता. भुसावळ येथील मुलीशी विवाह झाल्यानंतर त्यास दोन मुली व मुलगा असे तीन अपत्य आहेत. पत्नी व कुटुंब मंगलसिंग जयसिंग सोबतच राहत होते. मंगलसिंग जयसिंग परदेशी हा दसर्‍यानिमित्त एक महिन्यासाठी घरी आपल्या कुटुंबासह सुटीवर आला होता. 30 ऑक्टोबरला सुटी संपल्यानंतर पठाणकोट येथे सेवेत हजर झाला होता. या वर्षातील डिसेंबर अखेर सुटी संपल्याने गावी चार ते पाच रविवारी भैरवनाथाची यात्रा भरत असल्याने पुढील वर्षी जानेवारी महिन्यात यात्रेसाठी एक महिन्याच्या सुटी घेऊन कुटूंबीयासह सुटीवर येणार असल्याचे जातांना सांगून गेला होता. मंगलसिंग जयसिंग परदेशी याचा स्वभाव सतत हसरा व मनमिळावू होता. मंगलसिंग शहिद झाल्याने गावाता शोककळा पसरली आहे. सोमवारी सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !