आक्षेपार्ह स्टेटस ठेवले : शेगावातील युवकांना अटक
शेगाव : दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे गाणे व आक्षेपार्ह फोटोचे स्टेट्स ठेवणार्या शहरातील दोन युवकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांनाही सोमवारी अटक केली. नागेश सुरेश गावंडे (21), अजय श्याम घोंगे (18, दोघेही रा.भुतबंगला परीसर, शेगाव) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.
भावनपा दुखावणारा मजकूर स्टेटसवर ठेवला
पोलिसांचे पथक वाहनाने शहरात गस्त घालत असताना सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास संशयीतांनी मोबाईलवरील इन्स्टाग्राम अकाउंटवर धार्मिक भावना दुखावणारा व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरी (स्टेट्स) म्हणून ठेवून दोन भिन्न धर्मामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या नेतृत्वात योगेशकुमार दंदे, गजानन वाघमारे, गणेश वाकेकर, उमेश बोरसे, विजय साळवे, बारवाल करीत आहेत.



