विवाहितेवर आधी सामूहिक अत्याचार नंतर दोन लाखात विकले


नवी दिल्ली : भांडणातून घर सोडलेल्या विवाहितेवर बाका प्रसंग ओढवला. सामूहिक अत्याचार करण्यात आल्यानंतर नराधमांनी विवाहितेची दोन लाखांची विक्री केल्याची घटना राजस्थानच्या भरतपूरमध्ये घडली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.

आधी महिलेवर गँगरेप, नंतर विकले पीडितेला
गँगरेपच्या घटनेनंतर तिला राजस्थानच्या करौली भागात 2 लाख रुपयांना विकल्याचा आरोप पीडितेने केला आहे. जिथे त्या महिलेला 8 महिने ओलीस ठेवले होते. त्यानंतर ती कशीतरी तेथून बाहेर पडण्यात यशस्वी झाली आणि तिने मथुरा गेट पोलिस ठाण्यात आरोपी महेश शर्माविरुद्ध तक्रार दाखल केली. पीडितेने सांगितले की, तिला आरोपीने त्याची विधवा मुलगी म्हणून विकले होते.





आरोपीने विधवा मुलगी म्हणून विकले महिलेला
पीडितेने सांगितले की, ती मथुरा गेट पोलिस स्टेशन परीसरात राहणारी आहे. पतीशी भांडण करून ती माहेरी जात होती. त्यानंतर मथुरेतील गोवर्धन येथील बसस्थानकात राहणारा महेश शर्मा याने तिला फूस लावून गोवर्धन येथे नेले. जिथे त्याने साथीदारांसह सामूहिक बलात्कार केला, त्यानंतर करौली येथे राहणार्‍या एका व्यक्तीला दोन लाखांत विकले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !