काय सांगता ! पंतप्रधान नरेंद्र मोदीचे ट्वीटर अकाऊंटच झाले हॅक


नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर अकाउंट हॅक झाल्याने देशात मोठी खळबळ उडाली. अकाऊंट हॅक करण्यात आल्यानंतर बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता देण्याबाबतची ट्विटवर घोषणा करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांचे ट्वीटर अकाउंट रविवार, 12 डिसेंबर रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हॅक करण्यात आले होते. त्यानंतर तात्काळ हे अकाऊंट पूर्ववत करण्यात आलं आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

बिटकाईनबाबत ट्टीट
अल्प कालावधीसाठी हे अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. या वेळात अकाऊंटवरून जे ट्वीट करण्यात आलं त्याकडे दुर्लक्ष करावं असं पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे. अकाऊंट हॅक करण्यात आल्यानंतर रात्री 2.11 ते 2.15 या कालावधीत या अकाऊंटवरून बिटकॉईन संदर्भात ट्वीट करण्यात आलं. भारताने बिटकॉईनला कायदेशीर चलन म्हणून स्वीकारलं आहे, असं या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. सरकार अधिकृत पातळीवर 500 बिटकॉईनची खरेदी करेल आणि नागरिकांमध्ये ते वितरित करण्यात येईल असं या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. या ट्वीटमध्ये कथित घोटाळ्याची लिंकही देण्यात आली होती.





ट्विटरने दिली माहिती
या घटनेबाबत ट्विटरने पत्रक काढून माहिती दिली आहे. यामध्ये ट्विटरने सांगितले की, आम्हाला पंतप्रधान मोदींच्या अकाउंटमध्ये गडबड झाल्याची माहिती मिळताच आम्ही त्वरीत सक्रिय झालो. ट्विटर इंडियाने सांगितले की, आमच्या आतापर्यंतच्या तपासामध्ये समजले की, सद्यस्थितीमध्ये कुठलेही संकेत मिळालेले नाहीत. ट्विटरच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आमच्याकडे पंतप्रधान कार्यालयासोबत संवाद साधण्यासाठी 24 बाय 7 लाईन सुरू असतात. आम्हाला या हॅकिंगबाबत समजले तेव्हा आमच्या टीमने सदर अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी त्वरित आवश्यकती पावले उचलली. आमच्या आतापर्यंतच्या तपासामध्ये हे अकाऊंट वगळता कुठलेही अन्य अकाऊंट हॅक झाल्याची माहिती मिळालेली नाही.

मध्यरात्री ट्विटर हॅण्डल हॅक
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ट्विटरच्या अंतर्गत तपासामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अकाऊंट हॅक झाल्याची घटना ही कुठल्याही सिस्टिममध्ये गडबड झाल्यामुळे झालेली नसल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अधिकृत ट्विटर हँडल रात्री उशिरा हॅक झाले होते. रात्री दोन वाजून 11 मिनिटांनी याबाबतचे एक ट्विट करण्यात आले होते. त्यामध्ये भारताने बिटकॉईनला अधिकृतरीत्या कायदेशीर मान्यता दिली आहे. तसेच सरकारसुद्धा 500 बिटकॉईन खरेदी करून लोकांना वाटत आहे, असे ट्विट करण्यात आले होते. दोन मिनिटांनंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले. मात्र पुन्हा 2 वाजून 14 मिनिटांनी याचप्रकारचे ट्विट करण्यात आले. मात्र नंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले. पण तोपर्यंत या ट्विटचे स्क्रिनशॉट व्हायरल झाले होते.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !