मोठी बातमी : भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आल्यानंतर त्याविरोधात भाजपाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली मात्र न्यायालयानं आमदारांचं निलंबन रद्द करण्यास नकार दिल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे, तर महाविकास आघाडी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.