केरळ हादरले : 12 तासात भाजपच्या बड्या नेत्यासह दोघांची हत्या


तिरुवनंतपुरम : 12 तासांच्या आत दोन दोन राजकीय हत्यांमुळे केरळमध्ये मोठी खळबळ उडाली असून केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे. परीस्थिती नियंत्रणा आणण्यासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनीही घटनेची निंदा केली आहे. भाजपा ओबीसी मोर्चाचे सचिव रंजित श्रीनिवास यांची घरात घुसून हत्या करण्यात आली तर दुसर्‍या घटनेत केरळमधील सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सचिव के.एस.शान यांचीही हल्ला करून हत्या करण्यात आली.

केरळमध्ये जमावबंदीचे कलम लागू
12 तासांच्या आत दोन नेत्यांची हत्या झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी अलाप्पुझामध्ये दोन दिवसांसाठी कलम 144 लागू केले आहे. तर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या दोन नेत्यांच्या झालेल्या हत्येचा घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी पोलिसांवर हल्ला करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.





के.एस.शान यांची निर्घृण हत्या
के.एस.शान हे दुचाकीवरून घरी जात असताना एका कारने त्यांना धडक दिली. त्यानंतर के.एस. शान हे रस्त्यावर पडले. मग कारमधील काही लोकांनी त्यांची हत्या केली. गंभीर जखमी झालेल्या शान यांना सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शरीरावर 40 हून अधिक वार दिसून आले. एसडीपीआय नेत्याच्या हल्ल्यानंतर पक्षाध्यक्ष आणि एम.के. फैजी यांनी या प्रकरणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप करण्यात आला.

भाजपा ओबीसी मोर्चाचे सचिव रंजित श्रीनिवास यांचीही त्या
रंजित श्रीनिवास हे 2016 विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार म्हणून अलाप्पुझा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. ते एक वकील म्हणूनही ते ओळखले जायचे. भाजपच्या नेत्यांच्या एक गटानं हे हत्याकांड घडवून आणलं असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. काही लोकांचा समूह 40 वर्षीय श्रीनिवास यांच्या आज सकाळी घरी पोहोचला होता. त्यानंतर त्यांच्या घराच्या दरवाजा ठोठावण्यात आला. दरवाजा उघडताच समुहानं श्रीनिवास यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 11 जण ताब्यातही घेतलंय. त्यातील काही जणांचा थेट या हत्येशी संबंध असल्याची माितिी आहे. सध्या श्रीनिवास यांचं मृतदेह रुग्णालयात ठेवण्यात आला असून पोस्टमॉर्टेमनंतर त्यांच्यावर अंतसंस्कार केले जाणार आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !