संतापजनक : विवाहबाह्य प्रेमसंबंध सांगण्याची धमकी देत विवाहितेवर सामूहिक बलात्कार


नवी दिल्ली : विवाहितेचे प्रेमसंबंध उघड करण्याची धमकी देत घराशेजारीच राहणार्‍या दोघांनी बलात्कार केला. तेलंगणातील हैदराबादमध्ये संतापजनक घटना घडली. या घटनेनंतर पीडित महिला आणि तिचा प्रियकर यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हे प्रकरण उघड झाले. बांधकाम कामगार असलेल्या या महिलेला त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आलं आहे.

आरोपींना पोलिसांकडून अटक
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एस. आर. नगर येथे पीडित बांधकाम कामगार महिलेचे तिच्या एका सहकार्‍यासोबत विवाहबाह्य संबंध होते. ती 13 डिसेंबरला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी जात होती. त्यावेळी दोन व्यक्तींनी तिला पकडलं आणि तिच्या प्रेमप्रकरणाविषयी घरच्यांना सांगू, अशी धमकी दिली. आरोपींनी महिलेला एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, असे पोलिस तक्रारीत म्हटलं आहे.





अत्याचारानंतर आत्यमहत्येचा प्रयत्न
आरोपींनी अत्याचार केल्यानंतर मंगळवार, 14 डिसेंबरला पीडित महिलेने आपल्या प्रियकरासोबत विकाराबाद जिल्ह्यातील एका निर्जनस्थळी जाऊन तेथे किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिच्या प्रियकराने बेशुद्ध होण्याआधी घरच्यांना फोन केला आणि या परीस्थितीची माहिती दिली. यानंतर दोघांनाही तत्काळ रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. पीडित महिलेने शुद्धीवर आल्यावर पोलिसांना दिलेल्या जबाबात सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत दोन आरोपींना अटक केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !