गतिमंद मुलीवर बलात्कार : आरोपी जाळ्यात
मालवण : मालवण शहरानजीक एका गावातील गतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार (Balatkar) झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात (Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सच्चिदानंद उर्फ भाई श्रीकृष्ण केळुसकर (35) विरोधात गुन्हा दाखल करून रविवारी रात्री उशिरा त्यास अटक केली. या प्रकरणी नियंत्रण कक्ष (Control Room) ओरोसच्या पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे अधिक तपास करत आहेत.



