ईडीकडून ऐश्वर्या राय बच्चनची साडेपाच तास चौकशी


मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ऐश्वर्या राय बच्चनला चौकशीसाठी बोलावल्यानंतर साडेपाच तास चौकशी केली. याप्रकरणी ईडीने नुकतीच अभिषेक बच्चनलाही समन्स बजावले होते.

पनामा प्रकरणी चौकशी
ऐश्वर्या राय बच्चनला यापूर्वीही दोन वेळा बोलावण्यात आले होते. मात्र दोन्ही वेळा तिने नोटीस स्थगित करण्याची विनंती केली होती. पनामा पेपर्स लीकची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर तिने ही विनंती केली होती. फेमा प्रकरणी ईडीने ऐश्वर्याला समन्स बजावले होते. हे समन्स 9 नोव्हेंबर रोजी ‘प्रतिक्षा’ म्हणजेच बच्चन कुटुंबीयांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले होते. यावर १५ दिवसांत उत्तर मागितले होते. ऐश्वर्याने ई मेलद्वारे ईडीला उत्तरही दिले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीमध्ये ईडी, आयकर विभाग आणि इतर एजन्सींचाही समावेश आहे.





नेमकं काय आहे पनामा पेपर लीक प्रकरण?
पनामा पेपर्स लीक प्रकरणात एका कंपनीचे (Mossack Fonseca) लिगल दस्तऐवज लीक झाले होते. हा डेटा जर्मन वृत्तपत्र Suddeutsche Zeitung (SZ) ने 3 एप्रिल 2016 रोजी Panama Papers या नावाने प्रसिद्ध केला होता. यात भारतासह 200 देशांतील राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटींची नावे होती आणि त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप होता. यात 1977 ते 2015 अखेरपर्यंतची माहिती देण्यात आली होती. या यादीत 300 भारतीयांची नावे होती. यात ऐश्वर्याशिवाय अमिताभ बच्चन, अजय देवगण तसेच पळपुट्या विजय माल्याच्या नावाचाही समावेश होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !