घरजावई म्हणून आला मात्र सासुला घेवूनच पळाला : या राज्यात घडली घटना
मुंबई : घर जावई म्हणून बिर्हाड टाकलेल्या जावयाने सासूसोबतच अफेयर केले व दोघे घरातून पसार झाले. ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली. लोकल मीडियानुसार, 2016 मध्ये शिफाली दासची मुलगी प्रियंका दासचं रामपुरहाट येथे राहणार्या कृष्ण गोपास दाससोबत लग्न झालं होतं. पण झालं असं की, गत शनिवारी शिफाली दास आपल्या मुलीच्या नवर्यासोबत म्हणजे जावयासोबत पळून गेली. कथितपणे दोघांमध्ये बर्याच वर्षांपासून अनैतिक संबंध होते. सासरा बबला दास आणि तिची मुलगी प्रियंका दासने लिलुआ पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सासूला घेऊन पळून गेलेल्या कृष्ण गोपाल दासच्या पत्नीचा आरोप आहे की, लग्नानंतर तिचा पती तिला मारहाण करत होता आणि शिवीगाळही करत होता.
पत्नीने विरोध केला तर पतीने केली मारहाण
प्रियंकाने आरोप केला की, जेव्हा तिला पती आणि आईच्या संबंधाबाबत समजलं तेव्हा तिने याचा विरोध केला. त्यानंतर पतीने मारहाण केली. प्रकरण जेव्हा वाढलं तर आरोपी पती आपल्या पत्नीला सोडून आपल्या सासरी जाऊन राहून राहू लागला. आरोप आहे की, सासरी तो अनेक महिन्यांपासून घर जावई म्हणून राहू लागला होता आणि याच दरम्यान सासू आणि जावयात जवळीक वाढली. पोलिस आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत.



