शिक्षिकेचा विनयभंग : अल्ताफ कचोरी पोलिसांच्या जाळ्यात
पतीलाही आरोपीने केली होती मारहाण ; भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी
भुसावळ- विनयभंग व मारहाण प्रकरणातील संशयीत आरोपीला अटक करण्यात भुसावळ बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. अल्ताफ उर्फ कचोरी शरीफ तडवी (22, रा.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 18 मार्च रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शिक्षिका असलेली विवाहिता शहरातील एका शाळेजवळून जात असताना आरोपीने विनयभंग केला होता शिवाय त्यास हटकल्याने पीडीत विवाहितेच्या पतीसही आरोपीने मारहाण करीत 400 रुपयांची रक्कम लुटून पोबारा केल्याने या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आरोपी पसार यशस्वी झाला होता.
यांच्या पथकाने आवळल्या आरोपीच्या मुसक्या
संशयीत आरोपी फैजपूर शहरातील इस्लामपूर भागात असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ निरीक्षक देविदास पवार यांया मार्गदर्शनाखाली नाईक रमण सुरळकर, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, ईश्वर भालेराव आदींच्या पथकाने केली.