डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरण : तिघा संशयीत आरोपींना जामीन


खटल्याच्या सुनावणीपर्यंत परवाना रद्दचे मेडिकल कौन्सीलला आदेश

मुंबई : नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणात डॉ. हेमा अनुजा, डॉ. भक्ती म्हेत्रे आणि डॉक्टर अंकिता खंडेलवाल यांना अटी शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने दोन लाख रुपयांच्या जात मुचलक्यावरील बॉण्डवर हा जामीन मंजूर केला आहे. मात्र, या प्रकरणाची सुनावणी सुरू असेपर्यंत या तिन्ही डॉक्टरांचा परवाना रद्द करण्याचे आदेश महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलला दिले आहेत.

22 मे रोजी केली होती आत्महत्या
भिल्ल जातीची असलेल्या डॉ.पायल तडवी यांचा सहकार्‍यांकडून छळ होत असल्याने डॉ.पायलने नायर रुग्णालयाच्या हॉस्टेलमधील राहत्या रूमवर पंख्याला स्टोल अडकवून पायलने आयुष्याचा अंत केला. डॉक्टर होण्यासाठी जळगावातून मुंबईत आली. नायरसारख्या रुग्णालयात आपल्याला शिकण्याची संधी मिळाली, याचा आनंद मानून मोठी स्त्रीरोग तज्ज्ञ होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारी तडवी वयाच्या 26 व्या वर्षी रुग्णालयातील वरिष्ठ सहकार्‍यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आपल्या आयुष्याचा शेवट करण्याचा निर्णय घेते. ‘यांच्याबरोबर (डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहरे व डॉ. अंकिता खंडेलवाल) मी आता एक मिनिटही राहू शकत नाही. दरम्यान, याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींना अटी आणि शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार, आरोपींना मुंबईबाहेर जाता येणार नाही तसेच नायर रुग्णालय परीसरातही फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे.


कॉपी करू नका.