होय, माझ्या मनात महात्मा गांधीबद्दलच तिरस्कारच : कालिचरण महाराज पुन्हा बरळला


नवी दिल्ली : अकोल्याच्या कालीचरण महाराज याने धर्म संसदेतील एका कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटले असतानाच छत्तीसगडमध्ये कालिचरणविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आला. त्यानंतर, पुन्हा एकदा व्हिडिओतून कालीचरणने गांधींचा द्वेष असल्याचं म्हटले आहे.

वक्तव्याचा पश्चाताप नाहीच
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अवमानकारक भाषा आणि अपशब्द वापरल्यामुळे चर्चेत आलेल्या कालीचरणला आपल्या वक्तव्याचा कुठलाही पश्चाताप नसल्याचं दिसून येत आहे. कालीचरणने आणखी एक व्हिडिओ शेअर करत पुन्हा एकदा नथुराम गोडसेला साष्टांग नमस्कार घातला आहे. तर, महात्मा गांधीबद्दल केलेल्या विधानामुळे एफआयआर दाखल झाल्याचा खेदही वाटत नसल्याचे कालीचरणने या व्हिडिओतून म्हटले आहे. कालिचरण महाराजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. अपशब्दांचा वापर केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याच्या विधिमंडळातील हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद पाहायला मिळाले. तर, छत्तीसगडमध्ये कालीचरणविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर, पुन्हा एकदा व्हिडिओतून कालीचरणने गांधींचा द्वेष असल्याचं म्हटलंय. ”गांधींबद्दल अपशब्द वापरल्याने माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे. याबद्दल मला पश्चाताप वाटत नाही. माझ्या मनात गांधींविरुद्ध तिरस्कार आहे, मी गांधींचा द्वेष करतो. याउलट मी गोडसेंना साष्टांग नमस्कार करतो, मी त्यांना महात्मा मानतो,” असेही कालीचरणने म्हटले आहे.





आक्षेपार्ह वक्तव्याने कालिचरण महाराज चर्चेत
26 डिसेंबर रोजी रायपूर येथे झालेल्या धर्म संसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध टिकरापारा पोलीस ठाण्यात भादंवि कलम 294 आणि 505 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रायपुरचे माजी महापौर आणि सभापती प्रमोद दुबे यांनी कालीचरण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची कडक भूमिका
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुंडांनी जर भगवी वस्त्र धारण केली तर त्यांना संत म्हणता येणार नाही, असे म्हणत निशाणा साधला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर छत्तीसगड पोलिसांनी तातडीने एफआयआर दाखल करुन घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच या प्रकरणामध्ये दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असंही बघेल यांनी म्हटले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !