पार्टीत दारू समजून अ‍ॅसिड पिले ; तिघांचा मृत्यू


धलाई : त्रिपुरामध्ये दारू समजून अ‍ॅसिड पिल्यामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. घटना त्रिपुरातील धलाई जिल्ह्यात घडली. त्रिपुरा पोलिसांनी सांगिल्यानुसार, सोमवार, 27 डिसेंबर रोजी एका पार्टीत तीन मद्यधुंद व्यक्तींनी दारुऐवजी चुकून अ‍ॅसिड प्यायले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.

यांचा झाला मृत्यू
पोलीस अधिकारी रत्न साधन जमातिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा जय पारा येथील सचिंद्र रेआंग (22), हजरधन पारा येथील अधीराम रेआंग (40) आणि नेपाळटीला भागातील भाबीराम रेआंग अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी एका पार्टीदरम्यान तिघांनी चुकून अ‍ॅसिड पिले. अ‍ॅसिड पिण्याआधी तिघेही आधीच दारुच्या नशेत होते.





घटनेने उडाली खळबळ
पोलिसांनी सांगितल्यानुसार, सोमवारी रात्री एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीत तीन मृतांसह 10 लोक सहभागी झाले होते. पार्टीत जास्त दारू प्यायल्यानंतर तिघांनी चुकून अ‍ॅसिड प्यायले. ते दारुच्या नशेत असल्याने दारू आणि अ‍ॅसिडमधील फरक समजू शकले नाही. घटनेनंतर लगेचच तिघांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, तेथून बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात रेफर केले. पण, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !