प्रेमासाठी वाट्टेल ते ! आधी विवाहितेला पळवले नंतर तिच्या चार वर्षीय मुलीचे केले अपहरण
नवी दिल्ली : प्रेमांत आकंठ बुडालेल्या प्रियकरांनी आपल्या विवाहित प्रेयसीला आधी पळवून नेले मात्र काही दिवसांनी प्रेयसी असलेल्या आईला आपल्या चार वर्षीय मुलीची आठवण सतावू लागताच प्रियकराने आपल्या दोन मित्रांच्या सोबत मुलीलाच पळवून आले. पोलिसात तक्रार झाल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. छत्तीसगढच्या कवर्धामध्ये ही घटना घडली. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार केल्यावर पोलिसांनी आरोपी सूरज वर्माला रायपूरमधून अटक केली.
विवाहिता प्रियकरासोबत पळाली
एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, जीताटोला येथे राहणारी विवाहिता तीन महिन्यांपूर्वी तिचा प्रियकर सूरजसोबत पळून गेली होती. महिलेला एक चार वर्षांची मुलगी आहे. या मुलीला महिला पतीकडेच सोडून गेली होती. एक दिवस महिलेला अचानक आपल्या मुलीची आठवण आली. त्यानंतर तिने प्रियकराला तिला आणण्यास सांगितलं. मग तिला प्रियकर सूरज दोन मित्रांसोबत जीताटोला गावात आला. इथे त्यांनी रेकी केली. त्यानंतर मुलीला बाइकवरून सोबत घेऊन गेले.




पोलिसात तक्रारीनंतर उलगडा
मुलीच्या वडिलांनी आधी मुलीचा गावात शोध घेतला. पण तिचा पत्ता कुठेही लागला नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यांनी मुलीची आई आणि तिच्या प्रियकरावर संशय व्यक्त केला. त्यानंतर कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलीला आईकडून परत आणलं. तेच प्रियकर आणि त्याच्या साथीदारांना अटक केली.
विवाहितेविरोधात गुन्हा नाही
पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. कवर्धा एसपी डॉ. लाल उमेद सिंह यांनी सांगितलं की, पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहत. सध्या महिलेविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. कुटुंबियांना मुलीची चिंता होती. ती सुखरूप घरी आल्याने त्यांची चिंता दूर झाली.