ईव्हीएममधील घोळामुळे सर्वांनाच धाकधूक -राज ठाकरे


मुंबई : ईव्हीएममध्ये घोळ असल्याचे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ते मान्य केलंय. पुढं काय होणार याची धाकधूक सर्वांनाच आहे. माहितीचा अधिकार केंद्र सरकारनं स्वत:च्या ताब्यात घेतलाय आणि केंद्र म्हणजे दुसरे-तिसरे कुणी नसून नरेंद्र मोदी व अमित शहा आहेत. सगळे हेच दोघे ठरवत आहे. कुठे आहे लोकशाही,’ असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मुंबईत आज झालेल्या मनसे पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कलम 370’चे पेढे वाटता, 371 मतदारसंघातील घोळाचं काय? असा प्रश्‍नही ठाकरे यांनी उपस्थित केला. ईव्हीएम’ मशिनमधील कथित घोळाविरुद्ध एल्गार पुकारणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मोदी सरकारवर पुन्हा एकदा तोफ डागली.


कॉपी करू नका.