लग्नाच्या आमिषाने पोलिस हवालदाराचा वकील तरुणीवर बलात्कार


पुणे : लग्नाचे आमिष दाखवून एका पोलिस हवालदाराने महिला वकिलाशी बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसात पोलिस हवालदार लक्ष्मण राऊत (33, रा.पत्रा चाळ, पाषाण) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल. संशयीत राऊत सध्या पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या एटीएस सेलमध्ये कार्यरत आहे.

महिला वकीलावर अत्याचाराचा आरोप
याप्रकरणी एका 29 वर्षाच्या महिला वकिलाने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी आणि लक्ष्मण राऊतची मार्च 2020 मध्ये मेट्रोमोनियल संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झाली. त्याने महिला वकिलाचा मोबाइल नंबर घेऊन ओळख वाढवली. लग्नाचे आमिष दाखवून देहूरोड, पिंपळे निलख येथील लॉजवर नेऊन तिच्याशी संबंध ठेवले. नंतर लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !